Ad will apear here
Next
संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी पाठपुरावा करणार
गडकरींच्या १०१व्या स्मृतिदिनी रंगकर्मी आणि साहित्यिकांचा निर्धार


पुणे :
ख्यातनाम नाटककार, लेखक आणि शब्दप्रभू कवी राम गणेश गडकरी यांच्या १०१व्या स्मृतिदिनानिमित्त २३ जानेवारी २०२० रोजी पुण्यातील संभाजी उद्यानातील मुख्य दरवाज्याजवळ त्यांच्या प्रतिमेची व साहित्याची पूजा करण्यात आली. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गडकरींचा पुतळा संभाजी उद्यानात पुन्हा बसवण्यात यावा, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली आणि तो पुतळा बसवेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.

कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्मरण सभेत गडकरी यांच्या प्रतिमेचे व साहित्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गोविंदाग्रज यांच्या निवडक सहा कविता‘रामगणेशाय नमः’ या पुस्तकांचे पूजन या वेळी करण्यात आले. 

या वेळी लेखक, नाट्य कलावंत श्रीराम रानडे म्हणाले, ‘आज गडकरींना मला वंदन करायला मिळते हे अभिमानास्पद आहे.’ गडकरींच्या स्मृतिशताब्दीनिमित्त त्यांच्या ‘एकच प्याला’ या संगीत नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने युवा पिढीला गडकरींची ओळख करून द्यायची संधी मिळाली, याचा अभिमान असल्याचे अभिनेते विजय गोखले म्हणाले.

रंगकर्मी योगेश सोमण म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी ज्या समाजकंटकांनी संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडला, त्याचा आम्ही निषेध करतो. पुतळा बसविण्यासाठी रंगकर्मींतर्फे आंदोलन करू आणि पुतळा पुन्हा उभा राहीपर्यंत संघर्ष करू.’ 

‘मसाप’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, ‘भाषाप्रभू गडकरी हे मराठीचे वैभव आहे. गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करू असे आश्वासन पुण्याच्या कारभाऱ्यांनी दिले होते. त्याचे पालन करून पुतळा लवकरात लवकर उभा करावा.’

कुसुमाग्रजांनी राम गणेश गडकरी यांच्यावर रचलेल्या ‘नमस्कार आहे’ या कवितेचे वाचन या वेळी विजय कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात आनंद पानसे, कवी राजन लाखे, प्रा. श्याम भुर्के, प्रा. क्षितिज पाटुकले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

 कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रस्ताविक व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या निमित्ताने दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांचे पुतळे त्वरित बसवले जावेत यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व रंगकर्मींच्या वतीने भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZLXCI
Similar Posts
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
मी ‘पुलं’चा एकलव्य : अशोक सराफ पुणे : ‘‘पुलं’चा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नसला, तरी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमच त्यांच्या सहवासात असतो. साहित्यातून पात्र उभे करण्याची ‘पुलं’ची शैली अवगत करून मी ती माझ्या अभिनयाद्वारे चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी यशस्वी ठरलो आहे. मी ‘पुलं’चा एकलव्य आहे.
विश्वात कुणीही बेसूर नाही; सूर वैश्विक आहेत पुणे : ‘विश्वात कुणीही बेसूर नाही. आपल्या रोजच्या बोलण्यातही संगीत आहे. मनाची सुरांबरोबर अगदी उत्स्फूर्तपणे तार जोडली जाते. त्यामुळेच सूर वैश्विक आहेत,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक स्वामी कृपाकरानंद यांनी केले.
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language